Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रेमासाठी काय पण : दोन लेकरांची माय प्रियकरा सोबत भुर्रर्र..... विवाहित पुरुषीही सैराट या जिल्ह्यात वाढले प्रमाण

 प्रेमासाठी काय पण : दोन लेकरांची माय प्रियकरा सोबत भुर्रर्र..... विवाहित पुरुषीही सैराट या जिल्ह्यात वाढले प्रमाण


जालना : बायको सतत त्रास देते जेवायला देत नाही अशा किरकोळ कारणावरून पुरुषांनी तर दारुडा नवरा मारहाण करतो सतत भांडण करतो यासारख्या कारणावरून महिलांनी घर सोडली आहे अनेक महिला पुरुषांनी लग्नानंतर ही प्रेम प्रकरणातून घर सोडल्याचे प्रकार समोर आले आहेत. यात दोन लेकरांची माहिती देखील आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलासोबत सैराट झाल्याची समोर आली आहे. मागील 15 महिन्यात अशाच विविध कारणांनी जिल्ह्यातील 477 महिला व 335 पुरुषांनी घर सोडली आहे . पोलिस दप्तरी बेपत्ता म्हणून याची नोंद झाली आहे आकर्षण आणि हुल्लड वय असल्याने अनेक मुले मुली अल्पवयीन असतानाच सैराट होतात त्याच्या तक्रारी ही पोलीस विभागात मोठ्या प्रमाणात आहेत. यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालली आहे हे देखील वास्तव आहे परंतु या अल्पवयीन मुलाप्रमाणे 18 वर्षावरील मुले मुली महिला पुरुषी घरातून निघून जात असल्याचे समोर आले आहे पोलिसांकडून त्यांचा शोध घेऊन त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केली जात आहे.

याचे कारण शोधल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर येतात तर काही प्रकरणांमध्ये किरकोळ कारणे असताना केवळ रागाच्या भरात अनेकाने घर सोडलेले असते घरातून निघून गेल्यावर काही लोकांना पश्चाताप झाला त्यामुळे ते स्वतःहून घरी परत असल्याचे सांगण्यात आले आहे पोलिसांकडून गेल्या पंधरा महिन्यात बेपत्ता झालेल्या 376 महिला आणि 261 पुरुषांचा शोध घेतला आहे.

काय सांगते आकडेवारी पहा

                       बेपत्ता         शोध

  1. महिला     477         376
  2. पुरुष.       335.        261
  3. मुली.         139.       130
  4. मुले.            36.          33
175 अल्पवयीन मुले मुली बेपत्ता

गेल्या पंधरा महिन्यांमध्ये जिल्ह्यातील जवळपास 175 अल्पवयीन मुले मुली विपत्ता झाले आहेत त्यापैकी 157 जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे तर आणखी 18 जणांचा शोध लागला नाही त्याचा शोध सुरू आहे बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या 139 वर मुलाची संख्या 36 वर आहे

ही आहेत या मागची कारणे

प्रेम प्रकरण वडील किंवा आई रागावणे घरातून पैसे खर्चायला न देणे दुचाकी न देणे मनासारखा मोबाईल घेऊन न देणे पती-पत्नीमध्ये सतत होणारे वाद प्रियकरांनी प्रेरेशीचा मोह यासाठी विविध कारणे आहेत परंतु सर्वात जास्त उदाहरणे ही प्रेम प्रकरणाचीच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे

तरच अपहरणाची नोंद

अठरा वर्षाच्या आतील मुलगी किंवा मुलगा पळून गेल्यास किंवा तिला कोणी फूस लावून पळून नेल्यात कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचा तो तर अठरा वर्षांवरील व्यक्ती गायब झाले असते तर म्हणून पोलीस दप्तरी केली जात आहे

बेपत्ता झालेल्या महिला पुरुष आणि अल्पवयीन मुला-मुलींचा शोध सुरू आहे बहुतांशी जन सापडले देखील आहेत काही महिला पुरुष हे प्रेम प्रकरणातून निघून गेल्याची उदाहरणे आहेत कोणत्याही गोष्टीवर भांडण हा पर्याय नसून दोघांनी समजुतीने घेतले तर यावर तोडगा निघेल
                       आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना


Post a Comment

0 Comments