इच्छुकांना लागले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध
मुख्यमंत्र्याच्या माहितीनुसार इच्छुकांत उत्साह
धाराशिव : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या रविवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या तीन महिन्यात घेण्यात येणार असे सुतवाच केल्याने इच्छुकांचे अपेक्षा पल्लवी झाले आहेत गेल्या पाहुणे तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडले आहेत आता माझी जिल्हा परिषद सदस्यांना देखील आगामी निवडणुकीचे वेध लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयात 4 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती निवडणुका गेल्या पॉलिथिन वर्षापासून रखडले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य व इच्छुक मंडळी या निवडणुकीची वाट पाहत आहेत नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला भरगोस यश मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास हरकत नाही अशी माहिती नेत्यांची धारणा झाली आहे.
4 जानेवारी रोजी च्या सुनावणीत अंतिम निर्णय झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे चित्र असल्याने निश्चितच येत्या तीन महिन्यात निवडणुका होतील असा अंदाज आहे मुख्यमंत्र्याच्या माहितीनुसार इच्छुकांच्या अशा तर पल्लवी झाली आहेतच शिवाय इच्छुक कामाला लागलेली आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य यात मागे नाहीत त्यांनी हालचाली सुरू केल्याची जोरदार चर्चा ग्रामीण भागात सध्या सुरू आहे.
0 Comments