Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतीला पाणी देण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी तिघांचा मृत्यू चार गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यातील धक्कादायक घटना :शेतीला पाणी देण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी तिघांचा मृत्यू चार गंभीर जखमी


धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी गावात शेतीला पाणी देण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू तर चार गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना रविवारी येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत  उघडकीस आली आहे. येथे भावकीच्या वादातून झालेल्या हाणामारीत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

या घटनेमध्ये आप्पा काळे, सुनील काळे आणि परमेश्वर काळे असं मयत झालेल्या तिघांची नावं आहेत. यामध्ये मयत सुनील काळे आणि परमेश्वर काळे हे बापलेक आहेत. या घटनेमध्ये तीन पुरुषांसह एक महिला गंभीर जखमी आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार , संबंधित घटना धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी गावात घडली आहे. येथे रविवारी मध्यरात्री पारधी समाजाच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. मागील काही दिवसांपासून या कुटुंबातील चुलत भावांमध्ये शेतात पाणी देण्यावरून वारंवार वाद सुरू होता. हा वाद रविवारी दि,५ रोजी इतका  विकोपाला की त्यातच त्यांच्या समाजातील  दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. पारधी समाजामध्ये झालेल्या दोन गटातील हाणामारी मध्ये मृतांमध्ये एका गटातील दोन तर दुसऱ्या गटातील एकजणाचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेतील संशयित आरोपींना पोलिसांनी  ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश क्षिरसागर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments