Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षकाचा खून करणाऱ्या शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा

शिक्षकाचा खून करणाऱ्या शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा धाराशिव न्यायालयाचा निकाल आर्थिक वादातून झाला होता खून


धाराशिव: पैशाच्या वादातून एका शिक्षकांनी दुसऱ्या शिक्षकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना धाराशिव शहरात दोन वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण होऊन 15 जानेवारी रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही जी मोहिते यांनी आरोपी शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी धीरज बाबू हुंबे व मयत शामराव उत्तमराव देशमुख हे दोघेही धाराशिव शहरातील श्रीपतराव हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते एकत्र काम करत असल्याने त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण होत होती.

या व्यवहारातूनच दोघांमध्ये नंतर कटूता आली 21 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा या दोघात वाद झाला यावेळी आरोपी हुंबे यांनी दगडाने मारल्यामुळे देशमुख दुचाकी करून खाली पडले यानंतरही हुंबे यांनी पुन्हा डोक्यात दगड घातला यामुळे देशमुख हे गंभीर जखमी झाले त्यानंतर देशमुख यांच्या मुलाने उपचारासाठी रुग्णालयात नेली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

याप्रकरणी आरोपी धीरज बाबू हुंबे  यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानसहिता कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासी अंमलदार बी आर कांबळे सहा पोलीस निरीक्षक यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले सदर प्रकरणांमध्ये अभियोग पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोग्यता महेंद्र बी देशमुख यांनी 9 साक्षीदारांची साक्षी नोंदवली.

या प्रकरणांमध्ये अभियोग पक्षाच्या वतीने आरोपीची ओळख पटवण्यासाठी मदत घेण्यात आली व त्या अनुषंगाने साक्षीदार तपासण्यात आले आरोपीने शामराव देशमुख यांना मारहाण केलेला घटनेत आठ वर्षाचा बालसाक्षर हा प्रत्यक्ष दर्शी व इतर एक प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार अभियोग पक्षातर्फे तपासण्यात आले ही साक्षे महत्वाची ठरली. या प्रकरणांमध्ये अभियोग पक्षाच्या वतीने दिलेला पुरावावर जिल्हा सरकारी वकील महेंद्र बी देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी मोहिते यांनी आरोपी धीरज हुंबे यांना बुधवारी दिनांक 15 रोजी जन्मठेपेची शिक्षा व दहा वर्षे दंड दंड न भरल्यास एक वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर कांबळे यांनी केलेला असून कोर्ट पैरवी म्हणून साठे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments