येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने मैलारपूर नगरी दुमदुमली येथील श्री.खंडेरायाच्या यात्रेमध्ये दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी
तुळजापूर : तालुक्यातील मैलारपूर नळदुर्ग येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा यात्रेचा सोमवारी दिनांक १३ मुख्य दिवस असल्याने मानाच्या काट्यासह राज्यासह पर राज्यातील लाखो भाविक श्रींच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषणाने ढोल ताशांचा हलगीच्या दणदणाटात झांजाचा खणखणाट वाघ्या मुरळीचा नाच व धनगरी गीताने मैलारपूर नगरी दुमदुमली होती.
भंडार्याच्या मुक्त उधळणीमुळे तीर्थक्षेत्र श्री खंडोबा देवस्थान हळदीने माखले आहे मैलारपूर येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त सोमवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला पौष पौर्णिमा व श्री.खंडोबा देवाच्या यात्रेस सोमवार असल्याने मध्यरात्री पार पडणाऱ्या छबिण्यासाठी नळदुर्ग व पंचक्रोशीतील गावासह लातूर जिल्ह्यातून नंदीध्वज मानाच्या काठ्या मोठ्या प्रमाणात मैलारपूर नगरीत दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रासह , कर्नाटक ,हुमनाबाद ,इंडी ,गुलबर्गा तेलंगणा व आंध्रप्रदेश आदी भागातून सायंकाळपर्यंत लाखो भाविक मैलापुरात नंदी ध्वज मानाच्या काट्यासह दाखल झाल्याने मैलारपूर नगरी भाविकांच्या मांदियाळीतुन फुलून गेली आहे. सोमवार हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पहाटे तीन वाजता काकड आरती ,४ वाजता श्रींची महापूजा .व महाअभिषेक संपन्न झाला यानंतर दिवसभर नवस नैवेद्य दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांचा येणारा ओघसुरूच होता पूजा नवस दंडवत भंडारा उधळण लंगर तोडणे यासह इतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. वाघ्या मुरळी चा हलगीच्या निनादावर नाच , पट बांधणे , बेल भंडारा आदी कार्यक्रम पार पडले.
दरम्यान रात्री दहा वाजेच्या सुमारास नळदुर्ग व अणदुर मानाच्या काठ्या व छबिना रुपी घोडे मानकरी यांसह निघून रात्री बारा वाजता अनुदुर व नळदृग च्या मानांच्या काठ्याचे शोभेच्या दारूची आताशबाजी करत मंदिर परिसरात आगमन झाले. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास छबिना मिरवणूक काढण्यात आली . छबिना निघाल्यावर श्रींच्या पालखीवर भंडारा खोबरे उधळणारे नवस्फूर्तीसाठी मल्हारी मार्तंड भैरव वास मनात जोजवत असतात मंगळवारी दिनांक १४ रोजी दुपारी तीन वाजता नगरपरिषद व नळदुर्ग कुस्ती आखाडा समितीच्या वतीने जंगी कुस्त्याचा कार्यक्रम झाला. यात्रेसाठी प्रशासन सज्ज असून यात्रा कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी पोलीस कर्मचारी राखीव दल तुकड्या कार्यरत कडक बंदोबस्त करण्यात आला होता.
0 Comments