अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले: एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल
मुंबई : निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड मधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजकुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर दिनांक 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीची प्रक्रिया
दिनांक 23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी उमेदवार अर्जाची छाननी, 4 नोव्हेंबरला आज मागे घेता येणार, 20 नोव्हेंबरला मतदान होईल. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे
महाराष्ट्रात 9.63 कोटी मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यापैकी चार कोटी 93 लाख पुरुष मतदारांची संख्या आहे.
राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात 1 लाख 186 मतदान केंद्र आहे.
0 Comments