धाराशीव : साहित्यिक प्रेमचंद यांचे विचार देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे : प्राचार्य डॉ संदीप देशमुख
धाराशिव,दि.३१ येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने प्रसिद्ध उपन्यासकार मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त गुलमोहर भित्तिपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले,सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले, पुढे ते म्हणाले की,मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्यामुळे वैश्विक साहित्याला एक वेगळी दिशा मिळाली, साहित्य मनोरंजनाच्या कक्षेतून बाहेर येऊन सामाजिक झाले,सर्व सामान्य मजूर, शेतकरी,दिन दलितांना न्याय मिळण्याची प्रक्रिया प्रेमचंद यांच्या पासून सुरू होते,रंगभूमी,सेवासदन,गोदान,हे त्यांचे प्रसिद्ध उपन्यास आहेत,कफन,बूढी काकी,इदगाह,दो बैलों की कथा या त्यांच्या वाचनीय कथा भारतीय समाज विसरु शकणार नाही,साहित्याचे वाचन करण्याने सभ्य समाजाचा विकास होतो असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ केशव क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा स्वाती देडे यांनी मानले,सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments