शासकीय कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता, उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयचा निकाल
__________________________________
उस्मानाबाद: जिल्हा व सत्र न्यायाधीश उस्मानाबाद मा. कर्वे साहेब यांनी दिनांक 19/08/2023रोजी दिलेल्या निकालानुसार शासकीय कामका जात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्ततता केली आहे.
या घटनेची हकीकत पुढील प्रमाणे दिनांक 11/02/2015 रोजी उस्मानाबाद तालुक्यातील केशगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील माणिक व्यंकट देशमुख प्रा.आ .केंद्र केशेंगाव येथे पेशंट म्हणून गेल्याच्या कारणावरून तपासनीस वेळ लागत असल्याचे व शिवीगाळ झाल्याचे कारण नमूद करून दिनांक13/02/2015 रोजी बेंबळी पोलीस स्टेशन येथे,शासकीय कामकाजात अडथळा केल्या प्रकरणी भारती दंड संहिता कलम 353,504,व महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 110,117 अनुसार फीर्यादी डॉ मेंढेकर यांच्या वतीने आरोपीच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता,सदरील गुन्हाचा तपास पूर्ण होऊन सदरील प्रकरण उस्मानाबाद येथील सेशन कोर्टात चालू होते, त्या दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अँड.अजय वाघाळे यांनी काम पाहिले यावेळी आरोपीच्या वतीने वाघाळे यांनी फिर्यादी डॉक्टर ,तसेच वैद्यकीय अधिकारी,घटनास्थळ पंच व पोलीस तपास अधिकारी यांची साक्ष घेतली, यावेळी फिर्यादीच्या वतीनेआरोपीच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा सादर करता आला नाही,त्यामुळे व
आरोपीचे वकील वाघाळे यांनी सेशन कोर्टासमोर आरोपोच्या वतीने योग्य बाजु मांडल्या मुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली ,यावेळी वाघाळे यांना अँड.डी आर बिराजदार, अँड डी.डी शिंदे,अँड.हर्षद उमरदंड,अँड.मल्लीकार्जुन आपचे, यांनी सहकार्य केले .
0 Comments