Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुरला पायी चालत जाणाऱ्या भक्तासाठी जहीराबाद तेलंगना येथील समाजसेवकाकडून मोफत अन्नदान

तुळजापुरला पायी चालत जाणाऱ्या भक्तासाठी जहीराबाद तेलंगना येथील समाजसेवकाकडून मोफत अन्नदान

तुळजापुर - (प्रतिनिधी) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात सलग २५ वर्षांपासून श्री तुळजाभवानी ईजिंनीयरींग काँलेजच्या समोर पायी चालत येणाऱ्या लाखो भक्तासाठी मोफत अन्नदान सेवा जहीराबाद (तेलंगना) येथील एम.मानीया,नारायण दत्त, हनुमंत रेड्डी,श्रीकांत रेड्डी,व्यंकटेश, अँड.श्रीनिवास रेड्डी,मल्लिकार्जुन पाटील इत्यादी जन सेवा करतात तसेच त्यांच्यासोबत महिला पुरुष 70 ते 80 लोक परिश्रम तीन दिवस करतात. 

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य रवी कुमार मुतखन्ना पत्रकार प्रदीप अमृतराव 

ज्ञानेश्वर गवळी सोमनाथ शेटे संजय खुरुद यांच्या हस्ते शनिवारी सकाळी दहा वाजता उद्घाटन करण्यात आले. यावेळेस इत्यादी उपस्थित होते.

 हे माजी सैनिक आहेत.देशाची सेवा करून सेवानिवृत्त झाल्यावर मागील २४ वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहेत.पायी चालत येणारे भाविक महाराष्ट्र, कर्नाटक,तेलगांनां,आंध्र प्रदेशातुन लाखो भक्त लाभ घेत असतात.या अन्नदान करता पिण्याच्या पाण्याची मोफत टँकर व्यवस्था राहुल भोसले यांनी केली आहे.तसेच श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय मोफत जागा उपलब्ध करून देतात.


Post a Comment

0 Comments