नळदुर्ग- तुळजापूर बस रस्त्यास बंद पडल्यामुळे प्रवासी हैराण, नादुरुस्त बसमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
तुळजापूर : प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य असले तरी सध्याच्या अनेक बसेस प्रवाशांना सेवा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी सकाळी(ता.१२) रोजी तुळजापूर आगारातून निघालेली नळदृग तुळजापूर बस ही तीर्थ खुर्द ते मंगरूळ पाटीच्या मध्ये नादुरुस्त झाली.यामुळे सर्वच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या मार्गावरील सातत्याने बंद होणाऱ्या बसेसमुळे प्रवाशातून नाराजी व्यक्त होत आहे याकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
तुळजापूर आगारातील नळदृग कडून तुळजापूरकडे नियमित बस दि,१२ सकाळी नळदुर्गहून निघाली असता तीर्थ खुर्द ते मंगरूळ पाटी याच्यामध्ये सकाळी सव्वा दहा ते अकराच्या दरम्यान नियमित बस बिघाड झाली यामुळे बसमधील प्रवासी मिळेल त्या वाहनाने पुढे तुळजापूर गाठले, यामध्ये अनेक विद्यार्थी, वयोवृद्ध, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला . या आगारातून ग्रामीण भागात प्रवासासाठी नादुरुस्त बसेस पाठविल्या जातात असे प्रवाशातून बोलले जात होते. त्यामुळे त्या कधी व कुठे बंद पडतील व प्रवाशांची गैरसोय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे संबंधित एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रवाशाची तात्काळ गैरसोयी टाळाव्या अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
0 Comments