पोटच्या नऊ वर्षीय चिमुकल्या मुलीची जन्मदात्या पित्याकडून कुऱ्हाडीने घाव घालून खुन, धाराशिव जिल्ह्यातील घटना
धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे: मुलगी सतत आजारी पडत असल्याने व सायकल वरून पडून जखमी झाल्याने संतापलेल्या पित्याने अवघ्या ९ वर्षांची निरागस मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून जन्मदात्या पित्यानेच आपल्या लेकराचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शेळगाव येथे दिनांक 28 शनिवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी आरोपी बापाविरुद्ध आंबी पोलिस ठाण्यात खुना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या आहारी गेलेल्या बापाने हे राक्षसी कृत्य केले. त्या आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या धक्कादायक घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की परंडा तालुक्यातील शेळगाव येथे गौरी ज्ञानेश्वर जाधव वय नऊ वर्ष व ज्ञानेश्वर महादेव जाधव वय 35 वर्षे व आजी यांच्यासोबत राहत होती. तिची आई लहान असतानाच तिला सोडून गेली होती, इयत्ता चौथी मध्ये गावातील शाळेत शिक्षण घेत होती. तिचा आजी व वडील तिचा सांभाळ करत होते . गौरी सतत आजारी पडत होती व ती सायकल वरून पडून जखमी झाली होती. यामुळे तिचा वडील ज्ञानेश्वर हा संतापला होता. या रागातूनच त्याने शनिवारी दिनांक 28 रोजी रात्री मुलगी झोपली असता तिच्या डोक्यात खांद्यावर कपाळावर कोराडीने सपासप वार केला या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली व तिचा जागेत मृत्यू झाला.
ही ह्रदय द्रावक घटना घडल्यानंतर तब्बल वीस तास मृतदेह घरामध्येच ठेवला होता याचा सुगावा ज्ञानेश्वर ने कोणालाही लागू दिला नव्हता. दुसऱ्या दिवशी मुलीच्या आजीने रविवारी दिनांक 29 रोजी गावातील ग्रामस्थांना या घटनेची माहिती सांगितली. यावेळी ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना कळविल्यानंतर आंबी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पाचारण झाले. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केली, सदरील मुलीचा खून पोलीस तपासात वडिलांनी केल्याचे निष्पन्न झाले. पित्याने मुलीचा खून केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले. पोलिसांनी या घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सेवविच्छेदनासाठी शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शेळगाव बीटचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर जाधव यांच्या विरोधात आंबी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 36 तासानंतर मृतदेहावर शेळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या हृदय द्रावक घटनेमुळे गावासह जिल्ह्यात मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. असे हैवानी कृत्य करणाऱ्या पित्यास कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. |
पिता ज्ञानेश्वर जाधव व मयत -गौरी जाधव |
0 Comments