नळदुर्ग- तुळजापूर रोडवर एसटी व कारचा भीषण अपघात एक ठार, पाच प्रवासी जखमी-Tuljapur Accident News

Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग- तुळजापूर रोडवर एसटी व कारचा भीषण अपघात एक ठार, पाच प्रवासी जखमी-Tuljapur Accident News

नळदुर्ग- तुळजापूर रोडवर एसटी व कारचा भीषण अपघात  एक ठार, पाच प्रवासी जखमी-Tuljapur Accident News 


तुळजापूर :  तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील बारूळ पाटीजवळ मंगळवारी दि,9 रोजी  सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि सेंट्रो कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा  जागीच मृत्यू झाला, तर बसमधील पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या जखमींवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कळंब-उमरगा ही एसटी बस  तुळजापूरहून नळदुर्गच्या दिशेने जात होती. दरम्यान, बारूळ पाटीजवळ समोरून वेगाने येणाऱ्या सेंट्रो कारने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सेंट्रो कारचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातील मृत कार चालक एसटी महामंडळातील कर्मचारी असल्याचा माहिती समोर आली आहे.


या अपघाताची माहिती मिळताच तुळजापूर आगार प्रमुख श्री शिंदे यांनी  तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना वाहनांमधून बाहेर काढले. जखमींना तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. या अपघातातील मृताची आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments