श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे रामभक्त वैजनाथ गुट्टे यांनी राम कथा केली सादर-रामभक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
रामभक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- गहिनीनाथ गड देवकरा येथे सुरदास बाबाराव महाराज यांच्या संकल्पनेतून श्रीसंत मोतीराम महाराज समाधी प्राणप्रतेष्ठेनिमित्ताने सुरु असलेल्या चातुर्मास सत्संगसोहळ्यानिमीत्ताने सोमवारी सकाळी ११ ते २ यावेळेत श्री हभप वैजनाथ महाराज गुट्टे यांच्या मुखार्विंदातून श्रीरामकथा संपन्न झाली व नंतर मौजे नांदगाव ता.चाकूर येथील भाविकांनी पंचामृताची पंगत दिली.मधूकरी स्वरुपात संकलीत केलेल्या अतिशय सुंदर चपाती,वारन्न,भात व पचांमृत असा अनोखा उपक्रम नांदगाव ग्रामस्थांनी पार पाडला.या कार्यात नांदगावच्या प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीने संत सेवेच्या उद्देश्याने स्वत:ला झोकून देऊन रामभक्त आत्माराम बांडे महाराज,गोरख कोडफुके,बालाजी बाजगिरे व सर्व गुणीजन संत मंडळीच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.भाविकांनी मनोभावे भगवान गहिनीनाथाचे आशिर्वाद घेतले.सुरदास बाबाराव महाराज यांनी सर्वांचे तोंडभरून कौतूक करून सर्वांना आशिर्वाद दिले.व पुढील सोमवारी मौजे रोकडासावरगाच्या पंचामृत पंगतीवेळी आम्ही मोठ्या उत्साहाने येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्याचा संकल्प देवकरा ग्रामस्थांनी गुरुवर्य प्रल्हाद महाराज देवकरेकर व सन्माननीय हभप लहूदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या बैठकीत सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे.

0 Comments