नाशिक : भाऊबीजेच्या दिवशीच बहिणीसह मेहुण्याची हत्या, जमिनीच्या वादातुन काढला काटा
नाशिक : तालुक्यातील साडगाव गिरणारे येथील वृद्ध दांपत्याच्या हत्येचे गुढ अखेर उकलले आहे. भाऊबीजेच्या दिवशीच जमिनीच्या वादातून सख्या भावाने डोक्यात लाकडी दंडका मारून आपल्या बहिणीसह मेहवण्यास यमसदनी धाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीतास बेड्या ठोकले आहेत. बहिणीस मूलबाळ नसल्याने तिने वडिलोपार्जित जमिनीतील हक्कसोड करावा आणि तिच्या पतीच्या नावे असलेली जमीन ही आपल्या नावावर करावी या वादातून हत्याकांड घडल्याची माहिती अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार सोमनाथ सावळीराम बेंडकोळी वय 50 राहणार लाडाची शिवार तालुका जिल्हा नाशिक असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयताचे नाव आहे. माळरानावरील शेत वस्तीवर राहणाऱ्या चंद्रभागा रामू पारधी वय 65 व रामू राधा बुधवारी दिनांक 6 रोजी सकाळच्या सुमारास मृतदेह आढळून आला होत. दोघांचा अकस्मित मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तुळण्यात येत असताना स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविल्याने या घटनेचा उलगडा झाला. शवविच्छेदनात दोघांच्या छाती व पोटावर मारहाण करण्यात आल्याची पुढे आल्यान याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने ,अप्पर अधीक्षक आदित्य मीरखेलकर उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर ,आदींनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल त्यानुसार पोलिसांनी संस्थेचा माप काढून त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
आक्रोश करणारच निघाला खुनी
सर्वत्र शोध घेऊनही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या दांपत्याची कोणाशीही वैर नसल्याचे तसेच त्यांना मूलबाळ नसल्याचे वास्तव्यसमोर आल्याने पोलीस तपास थंडावला होता मात्र स्थानिक गुन्हे शाखेने परिसरात तळ ठोकून परिसर पिंजून काढत या घटनेचा उलगडा केला आहे. बहिण व मेव्हण्याच्या मृत्यूनंतर दुःखाचा डोंगर कोसळल्याचा आव आणणाऱ्या मृत महिलेच्या सख्ख्या भावानेच हत्याकांड केल्याची समोर आल्यामुळे संशितास बेड्या ठोकण्यात आल्या.
0 Comments