जनतेने विजयाचा आशीर्वाद द्यावा.....! शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे: तालुक्याला गतवैभव मिळवून देणार
तुळजापूर /राजगुरु साखरे : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सक्षम असून तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षअध्यक्ष बच्चुभाऊ कडू छत्रपती संभाजी राजे ,राजू शेट्टी यांचे हात बळकट करण्यासाठी जनतेने विजयाचा आशीर्वाद देऊन मला विधानसभेत पाठवावे असे आवाहन तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी बोलताना केले. जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून तालुक्याला गत वैभव मिळवून देईल अशी ग्वाही देखील त्यांनी बोलताना दिले. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार अण्णासाहेब दराडे यांच्या प्रचाराचा रामतीर्थ तांडा येथून शुभारंभ झाला आहे. अण्णासाहेब दराडे हे मूळचे हागलुर या गावातील असून त्याने मागील दोन महिन्यापासून चित्ररथाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावा गावातील ग्रामस्थांची संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतले आहेत, श्री दराडे यांचे विचार व धोरणे नागरिकांना पटत असल्यामुळे त्यांना गावोगावी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीत त्यांना मिळत असलेला हा जनतेचा प्रतिसाद पाहता निवडणुकीत त्यांना यश मिळवून देईल का ? याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गोरगरिबांच्या प्रश्नावर अडचणी विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपल्या पोरा बाळांच्या चांगल्या शिक्षणासाठी व उज्वल भवितव्यासाठी उभारलेल्या लढ्याची पहिली पायरी चढण्यासाठी तुम्हा सर्वांची आशीर्वादाची नितांत गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी मतदानरुपी आशीर्वाद द्यावा. गाव भेट दौऱ्याला मिळणारा उदंड प्रतिसाद हा भारावून टाकणारा आहे, ही लढाई कितीही मोठी प्रस्थापितांची, धनशक्तीची ताकत उभी राहिली तरी सामान्य जनतेच्या "जनशक्ती"चा विजय निश्चित आहे.
शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे तिसरी आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार
0 Comments