तिसऱ्या आघाडीचे उमेदवार शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडेंची बॅट सुसाट तुळजापूर मतदार संघातील विविध भागात संवाद दौरा ठरतोय भारी! नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
तुळजापूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अण्णासाहेब दराडे यांच्या प्रचारात तरुणासह महिलांही आता सक्रिय झाल्या आहेत. दस्तखुद्द शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे हे मतदार संघातील विविध गावातील नागरिकांच्या होम टू होम भेटी गाठी घेण्यावर मोठा भर दिला आहे.
मतदारसंघातील विविध गावात जाऊन श्री दराडे तरुण, महिलांसह ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. त्यांनी मागील दोन महिन्यापूर्वीच चित्ररथाच्या माध्यमातून मतदार संघ पिंजून काढला आहे .विशेष म्हणजे तिसऱ्या आघाडीची तालुक्यात ताकद वाढत असून दराडे यांच्या होम टू होम संवाद दौऱ्यास मोठा प्रतिसाद लाभत आहे. मतदार संघात तिसरा पर्याय म्हणून श्री दराडे यांचा विचार होऊ शकतो, शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी बॅट या चिन्ह वर बटन दाबून विजयी करावे असे आवाहन ते करत आहेत.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे.महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे एडवोकेट धीरज पाटील तर महायुतीकडून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आखाड्यात उतरले आहेत, तर समाजवादी पार्टीकडून देवानंद रोचकरी हे निवडणूक लढवत आहेत. तिरंगी वाटणारी ही निवडणूक तिसऱ्या आघाडीचे उमेदवार शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांच्यामुळे चौरंगी झाल्याचे म्हटले जात आहे. पहिल्यांदाच श्री दराडे यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी बॅट घेऊन निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. शेतकरी पुत्र आण्णासाहेब दराडे यांनी मागील दोन महिन्यापासून मतदार संघातील विविध गावात , वाडी वस्ती, तांड्यावर जाऊन त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतले आहेत, त्यामुळे अण्णासाहेब दराडे यांचे नावाची जोरदार चर्चा सुरू असून ग्रामस्थांमधून मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे मतदार संघात तिसऱ्या आघाडीची बॅट बाजी मारणार का? कोणाची विकेट घेणार अशी चर्चा सुरू आहे.
शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांचा भल्या सकाळी सुरू होणारा त्यांचा प्रचार दौरा रात्री उशिरापर्यंत सुरू राहत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मूळ गाव हगलूर येथील तरुण, महिला ग्रामस्थ, नातेवाईक प्रचाराची धुरा सांभाळताना दिसत आहेत. दराडे समर्थकांनी यंत्रणा तन मन धनाने प्रचारात उतरले असल्याचे चित्र गावोगावी दिसून येत आहेत. ज्या हक्काने मत मागायला आलोय त्या हक्काने आमदार झाल्यावर अडचणी सोडवायला येईल असा विश्वास श्री दराडे यांनी मतदारांना दिला आहे. येणाऱ्या 20 तारखेला बॅट या तिसऱ्या क्रमांकाचे चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी मतदारांना केले आहे.
0 Comments