व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार -धाराशिव जिल्हातील घटना -Dharashiv Crime News Live

Hot Posts

6/recent/ticker-posts

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार -धाराशिव जिल्हातील घटना -Dharashiv Crime News Live

व्हिडिओ व्हायरल  करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार -धाराशिव जिल्हातील घटना -Dharashiv Crime News Live 

धाराशिव : परंडा   तालुक्यातील आंबी  पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दिनांक १३ रोजी घडली याप्रकरणी पिडी तिने दिलेल्या फिर्यादीवरून आंबी  पोलीस ठाण्यात एका नराधम तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 17 वर्षीय 8 महिने मुलगी (नाव-गाव-गोपनीय) दि.19.11.2024 रोजी 17.00 ते दि.13.06.2026 रोजी 04.00 वा. सु. हिस गावातील एका तरुणानी  तु खुप आवडतेस मला तुझे सोबत लग्न करायचे आहे असे म्हणुन पिडीतेस फोन करुन मी माझे जिवाचे बरे वाईट करेल अशी धमकी देवुन तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच छायाचित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.24.06.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 137, 63, 351(2), 3(5) सह कलम 4,6 लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments