मौजे निलेगाव येथील संजीवनी शेतकरी गटातील २५ शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे-Tuljapur Crime News Live
"""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- दिनांक 25/06/2026 रोजी मौजे निलेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत गळीत धान्य योजनेअंतर्गत शेतकरी गटांची ऑनलाइन पद्धतीने निवड झालेल्या संजीवनी शेतकरी गट 25 शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे मोफत वाटप करण्यात आले
तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी सत्यजित देशमुख उप कृषी अधिकारी धन्यकुमार बिराजदार साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी राहुल मते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना एल निलो चा परिणाम व पेरणीचे नियोजन बियाण्याची उगवण क्षमता तपासणी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया ,सरी वरंबा पद्धत बीबीएफ पेरणी विषयी सविस्तर माहिती दिली तसेच सोयाबीन उगवण क्षमता व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले
संजीवनी शेतकरी गट निवड केलेल्या 25 शेतकऱ्यांना प्रत्येकी 25 किलो सोयाबीन बियाण्याची एक बॅग व 250 मिली जैविक संघ वाटप करण्यात आले याप्रसंगी गटाचे अध्यक्ष मुखत्यार पापामिया शेख सचिव हसीना नासिर शेकदार व गटातील सर्व शेतकरी उपस्थित होते.

0 Comments