Hot Posts

6/recent/ticker-posts

यंदा सोयाबीन उत्पन्नात निम्मी घट , उत्पादन खर्चही निघणे झाले कठीण, शेतकरी रब्बीची पेरणी करण्यासाठी आर्थिक विवंचनेत


तुळजापूर/बालाघाट न्युज टाइम्स: उस्मानाबाद जिल्हा  परिसरामध्ये मागील पंधरा दिवसापासून सोयाबीनची काढणी सुरू आहे, सोयाबीनच्या राशी अंतिम टप्प्यात आले असून काही शेतकरी राशी उरकून घेत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली असून, काढणीचे दर मात्र पाच  हजाराच्या पुढे चालू आहेत. यंदा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली . त्यानंतरच्या काळात जुलैपासून सप्टेंबर पर्यंत सततचा पाऊस झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटली मधेच येल्लो मॅजिक रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यातून राहिली सुरले सोयाबीन हाती येईल अशी शेतकऱ्यांची आशा होती मात्र दिवाळीच्या आठ दिवस अगोदर परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे पिकांचे होत्याचे नव्हते झाले, अशा निसर्गाच्या निरनिराळ्या संकटामुळे यंदा सोयाबीन उतारा कमी येत असून दरवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे निम्मे उत्पन्न घटले आहे. एकरी तीन ते चार बॅग सोयाबीनचा उतारा येत आहे. तर काढणीचा दर मात्र पाच हजाराच्या वर गेला आहे. सोयाबीनच्या पेरणी पासून काढणीपर्यंतचा खर्च वीस हजाराच्या पर्यंत आहे, मात्र यंदा केलेला खर्चही निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यामुळे आता रब्बीची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.


Post a Comment

0 Comments