भीषण अपघात : धाराशिव शहरात उड्डाणपुलावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात एक ठार ,चार जण गंभीर जखमी-Dharashiv Accident News Today

Hot Posts

6/recent/ticker-posts

भीषण अपघात : धाराशिव शहरात उड्डाणपुलावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात एक ठार ,चार जण गंभीर जखमी-Dharashiv Accident News Today

भीषण अपघात  : धाराशिव शहरात उड्डाणपुलावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात एक ठार ,चार जण गंभीर जखमी-


धाराशिव :  धाराशिव शहरातील तुळजापूर -धाराशिव आयुर्वेदिक कॉलेज समोरील उड्डाणपपुलावर फॉर्च्यूनर गाडीचा अपघात घडल्याची घटना  आज दि,१४ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये काळया रंगाची फॉर्च्यूनर उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकली. या भीषण अपघातात एक जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातातील अपघातग्रस्त  प्रवासी वाशी तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असल्याचे समजते. फॉर्च्युनर गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट डिव्हायडरवर आदळल्याची प्राथमिक मिळत आहे,ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघात घटनेचा अधिक तपास धाराशिव पोलीस करत आहेत.





Post a Comment

0 Comments