नळदुर्ग- तुळजापूर रोडवर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल-Tuljapur-Naldurg Road Accident News

Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग- तुळजापूर रोडवर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल-Tuljapur-Naldurg Road Accident News

नळदुर्ग- तुळजापूर रोडवर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल-


 तुळजापूर : भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात दिनांक 8 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तुळजापूर ते नळदुर्ग  रोडवरील हंगरगा पाटी येथे घडला आहे. याप्रकरणी चार चाकी वाहन चालकाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,मयत नामे-बालाजी तुकाराम कोरे, वय 34 वर्षे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.08.12.2025 रोजी 15.30 वा. सु. मोटरसायकल वरुन जात होते. दरम्यान  हंगरला पाटी चे पुढे नळदुर्ग जाणारे रोड जानकी धाब्याचे जवळ  चार चाकी वाहन क्र एमएच 13 बीएन0544 चा चालकाने त्याचे ताब्यातील चार चाकी वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून बालाजी कोरे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बालाजी कोरे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवाजी तुकारम कोरे, वय 33 वर्षे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी दि.13.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106, 125(ब)  सह 184, 134 (अ)(ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

Post a Comment

0 Comments