Hot Posts

6/recent/ticker-posts

उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथे रेशीम लागवड कार्यशाळा संपन्न



नाईचाकूर /प्रतिनिधी:  उमरगा तालुक्यातील नाई चाकूर येथे कृषी विभागातर्फे रेशीम उद्योग व फळबाग कार्यशाळा घेण्यात आली.उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात रेशीम उद्योग व फळबाग लागवड वाढली पाहिजे यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कृषी विभागाने सखोल असे मार्गदर्शन करावे सांगितले आहे कृषी विभागातर्फे नाईचाकूर येथे दिनांक 16/ 11/ 2022 रोजी प्रभारी तालुका कृषी अधिकारी रक्षा काळुंगे व दत्ता भालेराव मंडळ अधिकारी उमरगा यांनी शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी तुषार सिंचन व ठिबक सिंचन जास्ती वापर करून मनुष्यबळ व आपले उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे शासनातर्फे अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान आहे तरी आपण तुषार व ठिबक सिंचन करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावा असे शेतकऱ्याला सांगितले आपल्या पिकाला व फळाला ठिबकने पाणी दिल्याने जमीन सुपीक व भुसभुशीत होते व ओलावा हटत नाही व त्या पिकाला पाणी देण्यासाठी मजूर लागत नाही शासनाच्या बऱ्याच योजना आहेत शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा महाडीबीटीवर आपण जाऊन ऑनलाईन करावे व आपणाला ट्रॅक्टर हार्वेस्टर ट्रॅक्टर चे सर्व अवजारे कृषी पंप भरपूर योजना आहेत शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे दत्ता भालेराव मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

रेशीम कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत स्वामी होती कृषी मंडळ अधिकारी दत्तात्रेय भालेराव यांनी शेतकऱ्यांना रेशीम उद्योग व फळभागाचे माहिती सांगितली श्री भालेराव यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत लागवड रेशीम लागवड उद्योग तीन वर्षासाठी तीन लाख 42 हजार रुपये अनुदान असले सांगितले  वर्षासाठी कमीत कमी लाख रुपये तीन लाखा उत्पन्न शेतकऱ्यांना घेता येतील जास्ती शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग चालू करावा असे सांगितले यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रभाकर नलावडे, सरपंच चंद्रकांत स्वामी ,उपसरपंच, बी के पवार,कृषी सेवक पी .बी .जानराव, ज्ञानेश्वर पाटील अतुल जाधव, गोरख पवार, बालाजी पवार व्यंकट गव्हाळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत.                                                                



Post a Comment

0 Comments