जेवळी/प्रतिनिधी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथे दि. ८ रोजी तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, यामध्ये लोहारा तालुक्यातील श्री.एस.पी.हायस्कूल वडगाव ( गां ) या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला .
वडगाव (गां) येथील श्री एस.पी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरीय स्पर्धेत विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे . यामध्ये धावणे स्पर्धेत गिराम ओंकार बालाजी ( २०० मीटर द्वितीय ) , फुलसुंदर दीक्षा ज्ञानेश्वर ( ४०० मीटर प्रथम. ) , फुलसुंदर रुक्मिण दशरथ ( ४०० मीटर द्वितीय ) , फुलसुंदर सुमित तुकाराम ( ८०० मीटर द्वितीय ) , साळुंके प्रणव विक्रम ( १५०० मी.द्वितीय ) , साळुंके प्रणव विक्रम ( ३००० मी.प्रथम. ) कुस्ती स्पर्धेत गिराम ओंकार बालाजी ( ४४ कि.वजन गट प्रथम ) , फुलसुंदर विजय बलभीम ( लांब उडी द्वितीय ) , देवकर सूरज हणमंत ( लांब उडी प्रथम ) या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वतीने शनिवारी दि. १० रोजी सत्कार करण्यात आला . यावेळी शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तंभ तथा मा .आरोग्य सहसंचालक डॉ.बी.पी.गायकवाड , सचिव प्रा . डॉ.एस.पी.गायकवाड , मुख्याध्यापक विजयकुमार गायकवाड यांनी अभिनंदन केले . या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक वाय. ए .येलुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments