तुळजापुर: महाराष्ट्रासह ,कर्नाटक ,आंध्र प्रदेश ,तेलंगणा राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मैलारपूर( नळदुर्ग) येथील श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी रविवारी दि,(२५) रोजी पाचव्या खेट्यास मोठी गर्दी केली होती. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील यात्रा झाली नसल्यामुळे भाविकांना दर्शन घेता आले नाही, यंदा मात्र सर्व निर्बंध हटवल्यामुळे श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी पहिल्या रविवारपासूनच भाविकांचा ओघ दिसून येत आहे. खंडोबाच्या मुख्य स्थानातील श्री क्षेत्र मैलारपूर( नळदुर्ग )हे एक ठिकाण आहे, खंडोबा आणि बानाईचा विवाह सोहळा येथेच झाला आहे त्यामुळे मैलारपूर हे श्रद्धेचे ठिकाण आहे. रविवारी सकाळपासून मंदिराच्या समोर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लावल्या होत्या, मैलारपूर येथील मंदिर परिसरात हॉटेल ,खेळणी, नारळाची दुकाने, पेढे विक्रेते, प्रसाद ,हारांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटल्याची दिसून आले . मैलारपूर येथे पावणे दोन महिन्याच्या वास्तव्यासाठी श्री खंडोबा देवाचे दि, २५ नोव्हेंबर रोजी आगमन झाले असून, येत्या ६ जानेवारीला यात्रा भरणार आहे , सकाळपासूनच येळकोट येळकोट जय मल्हार जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
0 Comments