तुळजापुर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींच्या शाकंभरी महोत्सवास दि,३० पासून प्रारंभ झाला आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाला काल घटस्थापनेने सुरुवात झाली.सात दिवसांपासून सुरू असलेली देवीची मंचकी निद्रा संपून काल देवी सिंहासनावर विराजमान झाली.पौष महिन्यातील अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सव काळात देवीची दररोज अलंकार पूजा मांडण्यात येणार आहेत.शाकंभरी नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली जलकुंभ यात्रा ३ जानेवारी रोजी आहे, यामध्ये तालुक्यातील कुमारिका ,सुवासिनी, आपल्या डोक्यावर पापनाश तीर्थ येथील पवित्र जलाचा कलश घेऊन मंदिर धुवतात त्यानंतर मंदिर संस्थांच्या वतीने खणा नारळाने या सर्व कुमारिका व सुवासिनीचे ओटी भरतात व तसेच तुळजाभवानी मातेचा देवीच्या वाहनावरून छबिना काढला जातो. दि,५ (गुरूवार) रोजी अग्निस्थापना यज्ञास प्रारंभ आणि रात्री छबिना काढण्यात येतो. तसेच ७ जानेवारी रोजी मंदीर संस्थांच्या वतीने अन्नदान महाप्रसादाचे आयोजन केले जाते व रात्री छबिना मिरवणूक काढून शाकंभरी महोत्सवाची सांगता होते. देवीजींच्या शाकंभरी महोत्सवात प्रारंभ झाल्यापासून मंदिरात भाविकांनी मोठी मांदियाळी होत आहे.
0 Comments