तुळजापुर: तुळजापूर तालुक्यातील किलज येथील पत्रकार रविचंद्र शिवाजी गायकवाड वय (३२)यांचा रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील सलगरा परिसरात दुचाकीचा अपघात होऊन गंभीर जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालय पाठवण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान दि,१९ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. रविचंद्र गायकवाड हे गेल्या दहा वर्षापासून धनराज न्युज चे संपादक म्हणून तुळजापूर येथे काम करीत असताना अनेक विषय हाताळून विविध प्रश्नावर प्रकाश ज्योत टाकले होते .तसेच दैनिक पुण्यनगरी , दैनिक समय सारथी, अशा वृत्तपत्रांमध्ये काम करत होते, रविचंद्र गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजतात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बालाघाट न्युज टाइम्स परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
0 Comments