नाईचाकूर /प्रतिनिधी : उमरगा, लोहारा, औसा, निलंगा तालुक्यातील १९००० हजार सभासद असलेला शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रतिपादन पूजन सोहळा आमदार अभिमन्यू पवार व सहपत्नी शोभा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. निलंगा उमरगा औसा तालुक्याच्या सीमेवर १९७२ रोजी संस्थापक अध्यक्ष संग्रामजी मागणीकर यांनी कारखान्याच्या उभारणीसाठी प्रयत्न केले संग्रामजी मागणीकर यांच्याबरोबर देवीसिंग चव्हाण यांनी कारखाना उभारण्याची संकल्पना मांडली व शासन दरबारी प्रस्ताव पाठविला १९६९ रोजी कारखान्याला मान्यता दिली व कारखान्याचे बॉयलर १९७२ ला पेटवले. मागील बऱ्याच वर्षापासून कारखान्यावर प्रशासक होते दोन-तीन प्रशासनाने बॉयलर पेटवली परंतु कारखान्यातून साखर काही बाहेर काढली नाही बॉयलर अग्निपतीपादन करताना अभिमन्यच पवार यांनी लवकरच मोळी टाकण्यात येईल व कारखान्यातून साखर बाहेर येईल याची ग्वाही दिली, प्रशासनाला पूर्ण सहकार करण्याची आश्वासन अभिमन्यु पवार यांनी दिले.तसेच रमेश माधवराव पवार मुख्य अभियंता शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पूर्ण मशनरीची दुरुस्ती झाली आहे आज कारखान्याचे बॉयलर प्रतिपूजन झाले लवकरच म़ोळी पूजन करून कारखाना चांगला चालेल परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे .यावर्षी कारखाना सुरू करण्यासाठी उशीर झाला परंतु पुढील वर्षी कारखाना लवकर चालू करून परिसरातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतीचा ऊस कारखान्याला द्यावा व आपल्या परिसरातील सर्वात जुना व रिकवरी देणारा कारखाना म्हणून शेतकरी सहकारी साखर कारखाना ओळखला जातो या कारखान्याला आपण ऊस देऊन सहकार्य करावे असे मुख्य अभियंता रमेश पवार यांनी म्हटले यावेळी कारखान्याचे प्रशासक प्रवीण फडणवीस , नाईकवाडे एस. आर.,पवार टी.एन.(एमडी) वडजे एस.बी.कारखान्याचे कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments