Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेस लाखो भाविकांची मांदीयाळी, आज येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरने करण्यात आली पुष्पृष्टी


धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी(yedeshwari) देवीच्या यात्रोत्सवास गुरुवारपासून  प्रारंभ झाला असुन यात्रेसाठी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत, महाराष्ट्र ,आंध्रप्रदेश, तेलंगणा मध्य प्रदेश आदी राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले येरमाळा ता. कळंब(kalanb) येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमेची  यात्रेला लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येरमाळा नगरीत दाखल झाले आहेत. आज यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे जुना वेचण्याचा कार्यक्रम सकाळी संपन्न झाला व त्यानंतर तुळजापूर तालुक्याचे आ. राणाजगजीतसिंह  पाटील यांच्यावतीने पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली, या आनंद उत्सवाचे चित्र डोळे भरून पाहण्यासाठी देवीच्या असंख्य भक्तांनी गर्दी केली होती. 

यावेळी यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने यात्रेला छावणीची स्वरूप आल्याचे दिसत होते.


Post a Comment

0 Comments