धाराशिव: गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरणातुन धाराशिव तालुका व जिल्हा परिसरात शनिवारी दि,(८) रोजी सायंकाळच्या सुमारास येडशी, कळंब तालुक्यातील शिराढोन आदिसह परिसरात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडकासह गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गासह शेतात काम करणाऱ्या मजुरांची चांगलीच धांदल उडाली, दरम्यान या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्ग करत असून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जिल्हा परिसरातील काही भागात शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता, यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र पुन्हा एकदा अवकाळी पावसाने डोके वर काढले असून शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास व शनिवारी सायंकाळीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
0 Comments