Hot Posts

6/recent/ticker-posts

एकाच कुटुंबातील तिघांना घरकुल ! शासनाची फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्याची पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे मागणी |A house for three in the same family!


छत्रपतीसंभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथील येथील एकाच कुटुंबातील तिघांना घरकुलाचा लाभ देताना शासनाचे निकष, नियम धाब्यावर बसविण्यात आले. त्यातून शासनाची फसवणूक करण्यात आली अशी तक्रार पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथील प्रभू बाबुराव सुरडकर आणि त्यांची सून उज्वला सुरडकर यांनी रमाई घरकुल योजनेचा लाभ घेतला. त्यानंतर त्यांची आई  तुळसाबाई सुरडकर यांनी प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ घेतला यात शासनाची फसवणूक झाली असल्याची तक्रार लक्ष्मण दांडगे यांनी पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


प्रभू सुरडकर यांच्या कुटुंबातील या लाभार्थ्यांचे नावे वेगवेगळ्या शिधापत्रिकेत आहेत त्यांनी शासनाची कोणतीही फसवणूक केली नाही आरोपात काहीही तथ्य नाही हे आरोप राजकीय आहेत.

                    नाना दांडगे सरपंच जळकी बाजार ता. सिल्लोड लोड जिल्हा :छत्रपतीसंभाजीनगर.

Post a Comment

0 Comments