नाईचाकूर /प्रतिनिधी : उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) , काँग्रेस राष्ट्रवादी या तीन पक्षाची महाविकास आघाडी झाली त्या महाविकास आघाडीचा नाईचाकूर येथील ग्रामदैवत महादेव कुत्रोबा मंदिर नाईचाकूर शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे व ,काँग्रेसचे विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे संचालक केशव पवार यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला याप्रसंगी प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी उत्पन्न बाजार समिती आघाडीचे उमेदवार रणधीर पवार ,राजेंद्र तळीखेडे यांनी नाईचाकूर येथील मतदानांना मार्गदर्शन केले .
यावेळी उमेदवार रणधीर पवार राजेंद्र तळीखेडे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे ,माजी सभापती किसन कांबळे, केशव पवार, माजी प्राचार्य रावसाहेब पवार, शेषराव पवार ,रुकमांगद पवार, सरपंच चंद्रकांत स्वामी ,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतीश पवार, माजी चेअरमन रमेश पवार ,प्रदीप पवार ,संजय कांबळे ,भीमाशंकर पवार ,तानाजी काळे, बालाजी इटुबाने ,सिद्धेश्वर पवार ,बिभीषण पवार आदी मतदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments