आझाद मैदान मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलनाला राष्ट्रवादी माजी सैनिक सेल तालुका तुळजापूरचा जाहीर पाठिंबा
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर: तुळजापूर येथे राष्ट्रवादी माजी सैनिक सेल तालुका तुळजापूर तर्फे दि,३० रोजी तुळजापूर चे ना.तहसीलदार श्री मोहन पांचाळ यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मराठा आरक्षणा बद्दल निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले की दिं 06 मे 2023 पासून मराठा वनवास यात्रा,तुळजापूर येथून पायी सुरू करण्यात आली होती,ती यात्रा दि.06 जून रोजी आझाद मैदान, मुंबई येथे पोहोचली.
मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाची मागणी करीत आहेत ,मागील कित्तेक दिवसापासून मराठा बांधव आपले घर,परिवार सोडून आझाद मैदानावर ठिय्या धरून आहेत.
तरी महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून मराठा समाजाला न्याय द्यावा व आपला परिवार सोडून जे मराठा बांधव आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत त्यांना सन्मानाने आप आपल्या घरी पाठवावे,
असे निवेदन राष्ट्रवादी माजी सैनिक सेल तालुका तुळजापूर तर्फे देण्यात आले.यावेळी जिल्हाअध्यक्ष दत्ता नवगिरे राष्ट्रवादी माजी सैनिक सेल जिल्हा धाराशिव. ,माजी सैनिक दादा खबोले,सुर्यकांत भोजने, विठ्ठल लोखंडे व अनेक माजी सैनिक उपस्थित होते.
0 Comments