Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील जिजामाता विद्यालयात पालक मेळावा संपन्न

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील जिजामाता विद्यालयात पालक मेळावा संपन्न 

 तुळजापूर : तालुक्यातील लोहगाव येथे मातोश्री जिजामाता विद्यालय व कै.प्रभाकर भस्मे उच्च माध्यमिक विद्यालयात दि,८ रोजी पालक  मेळावा आयोजित करण्यात आला.  यावेळी प्रारंभी मा जिजाऊ च्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव मारेकर सर व ग्रामपंचायत सदस्य विनायक काटकर व पोल्ट्री उद्योजक  राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.या मेळाव्यास गावचे पोलीस पाटील शिवानंद पाटील व सोसायटीचे माझी चेअरमन  श्री रविकांत शिंगाडे उपस्थित होते या  मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी व शाळेतील वर्षभरातील उपक्रम यावर  चर्चा करण्यात आली.गावातील मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते .या मेळाव्याचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती पवार मॅडम यांनी केले सूत्रसंचालन क्षीरसागर सर तर आभार श्री कलशेट्टी सर यांनी मांडले  पालक मेळाव्यासाठी विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments