यमगरवाडी येथील एकलव्य आश्रम शाळेतील ७ वर्षीय बालकांचा मृत्यु
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर प्रतिनिधी :तुळजापूर तालुक्यातील निवासी शाळा असलेल्या सहा वर्ष चा इयत्ता पहिली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी मुलाचा आज दि,१२ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुर्दैव मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे .उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी सदर चिमुकल्याला मृत घोषित केले .नातेवाईकांचा आक्रोश असल्यामुळे तत्काळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील एकलव्य आश्रम शाळा यमगरवाडी येथे निवासी असून आज दि,१२ जुलै रोजी सायंकाळी सहा ते सव्वा सहा च्या दरम्यान मयत संस्कार प्रविण राठोड वय ०७ राहणार गंधोरा इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत होता .विद्यार्थी हे अंगणात खेळत असताना व शाळा सुटल्यानंतर मयत संस्कार हा सहा वाजण्याच्या सुमारास टॉयलेटला जातो म्हणून वस्तीगृहाच्या टॉयलेटला गेला .परत न आल्यामुळे वस्तीग्रहाचे अधीक्षक यांनी सदर टॉयलेट जवळ गेले असता मयत संस्कार पडल्याचं दिसून आले .तेथील शिक्षकाने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी संस्कारला मृत घोषित केले .सदर घटनेमुळे नातेवाईकांचा आक्रोश झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे,पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर चनशेट्टी,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर,यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली .सदर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेणार नाही सांगण्यात येत होती .नातेवाईकांचा आक्रोश असल्यामुळे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला .
0 Comments