तुळजापूर तालुक्यातील येथील कारखान्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
![]() |
प्रतिकात्मक फोटो |
या निवेदनात असे म्हटले आहे की तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स लिमिटेड कंपनीच्या कारखान्यातील विषारी वायू आकाशात सोडला जातो कारखान्याच्या धुरातून उत्सर्जित विषारी वायू हा हवेच्या प्रवाहानुसार आसपासच्या वीस ते पंचवीस किलोमीटर परिसरामधील ३० ते ४० गावासह तुळजापूर शहरात येत असल्याने नागरिकांना सदर वायूमुळे श्वसनाचे आजार, डोकेदुखी, उलट्या ,मळमळ असे विविध गंभीर आजार होत आहेत तरी संबंधित कारखान्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे. या निवेदनावर अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ प्रदेश सरचिटणीस मकबूल तांबोळी यांची स्वाक्षरी आहे.
0 Comments