Hot Posts

6/recent/ticker-posts

बहुजन रयत परिषदेच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री दयानंद निवृत्ती गायकवाड यांची नियुक्ती

बहुजन रयत परिषदेच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री दयानंद निवृत्ती गायकवाड यांची नियुक्ती

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


तुळजापूर : दयानंद निवृत्ती गायकवाड यांची यांना बहुजन रयत परिषदेचे 'लालुका अध्यक्ष तुळजापूर म्हणून नियुक्ती देण्यात येत आहे. हे नियुक्ती पत्र बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते देण्यात आले,बहुजन रयत परिषदेच्या ध्येय धोरणानुसार आपण आजपर्यंत केलेले काम सामाजिक निष्ठा व सामाजीक संघटनेसाठी घेतलेले कष्ट विचारात घेता आपली पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.शिक्षण, व्यवसाय कायदा चळवळ संघटन चातुर्य या संबंधीचे काम विचारात घेऊन आपली नेमणूक करण्यात येत आहे आपल्या कामाबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे म्हणून पुढील काळात सामाजिक संघटनेचे उत्तरदायित्व सांभाळताना किमान आठवड्यातील दोन दिवस संघटनेच्या कामाबद्दल आपण देऊ शकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

संघटनेच्या पातळीवर आपण सर्वजण सारखे व समान असून भविष्यात समाज प्रबोधनासाठी व समाज कल्याणाच्या सात्विक मागणीसाठी पुढारलेली चळवळ एकमताने करू शकतो अशी अपेक्षा आहे.


तालुका अध्यक्ष तुळजापूर या पदावर आपली नियुक्ती केले असून आपले मनपूर्वक अभिनंदन व भविष्यात जोरकसपणे कामाचा उठाव करावा अशी जबाबदारी सोपविले आहे.

सदरील पदाचा कालावधी नियुक्ती पासून १ वर्षा पर्यंत वैध राहील.यावेळी बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments