तुळजापूर येथे गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक, तुळजापूर येथे पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर प्रतिनिधी :तुळजापूर शहरांमध्ये श्री तुळजाभवानी मंदिर पाठीमागे आराधवाडी येथील एका हॉटेल चालकांनी अनाधिकृत शस्त्र (बंदूक) स्वतः जवळ बाळगवल्या प्रकरणी तुळजापूर पोलीस यांनी एक जण ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तोल जप्त केली आहे याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे .
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील श्री तुळजाभवानी मंदिर पाठीमागे आरादवाडी येथे दिनांक चार जुलै रोजी दुपारी 12:54 वाजण्याच्या सुमारास एक हॉटेल व्यवसाय करणाऱ्या कडे पिस्तोल असल्याची खात्रीदायक बातमी तुळजापूर पोलीस पथकास मिळाली त्यावरून मा . पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या आदेशावरून तुळजापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने वरील ठिकाणी छापा मारला असता सदर एक देशी बनावटीची पिस्तोल अग्नी शस्त्र स्वतःच्या कब्जात बाळगलेला सदर आरोपीकडे मिळून आली
यावरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवलदार अतुल यादव वय 41 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल चालक अक्षय नानासाहेब गायकवाड वय 24 वर्ष राहणार आरादवाडी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 273/23 कलम 3,25भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 नसूर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे हे करत आहेत .सदर पथकमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे,पोलीस हवलदार अतुल यादव,पोलीस हवालदार आनंद साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल शिरगिरे यांच्या पथकाने सदरची कारवाही केली.पुढील तपास पोलीस करत असून सदर आरोपीने पिस्तोल कुठून आणली याबाबत तपास सुरू आहे.
0 Comments