Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

लोहगाव येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात  साजरी       

     
        

 तुळजापुर: तालुक्यातील लोहगाव येथील  मातोश्री जिजामाता विद्यालय व कै. प्रभाकर भस्मे उच्च माध्यमिक विद्यालय लोहगाव येथे दि,१ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक  यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव मारेकर सर प्रमुख पाहुणे कोषाध्यक्ष सौ अलकाताई मारेकर  वरिष्ठ शिक्षक क्षीरसागर सर यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याच दिनाचे औचित्य  साधून अकरावी वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वेलकम कार्यक्रमही घेण्यात आला. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारावी सायन्स मधील विद्यार्थ्यांनी केली.प्रास्ताविक प्रा. माने मॅडम यांनी तर आभार श्री  क्षीरसागर सर यांनी मांडले. या कार्यक्रमास सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments