मणिपूर राज्यातील महिला वरील अत्याचार प्रकरणी आरोपींना कडक कायदेशीर कारवाई करावी,एकल महिला संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
तुळजापुर :एकल महिला संघटना तुळजापूर यांच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे,या निवेदनात असे नमूद केले आहे की,
मणिपूर राज्यातील कुकी आदिवासींना मिळणाऱ्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय लाभावरून बहुसंख्या असलेल्या मैतई या बिगर आदिवासी समाजाने केलेल्या विरोधातून वांशिक संघर्षातून आणि अन्याय त्याच्यातून हजारो आदिवासींच्या घरांची राख रांगोळी झालेली आहे. मोठ्या प्रमाणात नरसंहार, खून, बलात्कार झाल्याची प्रकरणे पाहायला मिळत आहेत. या सर्व घटना भारतीय लोकशाहीच्या आणि संविधानिक विचारात न बसणान्या आहेत
मणिपुर राज्यातील कुकी या समाजावरील अन्याय अत्याचार मागील दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून होत आहेत. त्यामध्ये कुक्की समाजातील तरुणींची सामूहिकपणे बिगर आदिवासी समाजाने निर्णयपणे धिंड काढून, अमानुषपणे त्यांच्या शरीराशी झोंबाझोंबी करून त्यांच्यावर सामूहिकपणे बलात्कार केलेले आहेत. अत्याचारीत मुलीचे वडील, भाऊ मदतीला आले असता त्यांनाही जिवंतपणे मारून टाकलेले आहे. मणिपुर राज्यातील इंटरनेट सेवा मागील दोन महिन्यापासून बंद असल्याने या घटना देशामध्ये समजण्यास उशीर झालेला आहे.असे निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर, लक्ष्मी वाघमारे,कविता वाघमारे,तानाजी जाधव, सुरेखा नन्नवरे, सुरेखा भोसले, उज्वला पवार विठाबाई मंडवळे, मीनाक्षी ईटकर,मंजू ईटकर, नागुबई चौगुले,सत्यभामा चौगुले, शालू पवार,उर्मिला मंकराज, कविता काळे, रोहिणी गायकवाड, धन्यकुमार माने, कपिल देवकते, आदुंबर करंडे,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments