नातेपुते येथे विद्यार्थी हितासाठी धडपडणाऱ्या शिक्षकाने स्वखर्चातून विद्यार्थी हजेरी साठी बसवली बायोमेट्रिक मशीन

Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथे विद्यार्थी हितासाठी धडपडणाऱ्या शिक्षकाने स्वखर्चातून विद्यार्थी हजेरी साठी बसवली बायोमेट्रिक मशीन

नातेपुते येथे विद्यार्थी हितासाठी धडपडणाऱ्या शिक्षकाने स्वखर्चातून विद्यार्थी हजेरी साठी बसवली बायोमेट्रिक मशीन


 नातेपुते प्रतिनिधी : नातेपुते  येथील नातेपुते एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विभागांमध्ये इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक अभिजीत वाळके यांनी स्वखर्चातून विद्यार्थी हजरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसविली. गेली पंचवीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग तसेच विद्यार्थ्यांसाठी नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमाची ओळख निर्माण करणारे अभिजीत वाळके सर यांनी यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. 


इयत्ता चौथी पर्यंत शिष्यवृत्ती परीक्षा असताना आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ ५० विद्यार्थी शिष्यवृत्ती आणले आहेत. तसेच गतवर्षी इयत्ता दुसरीचा वर्ग असताना एकही रविवार सुट्टी न घेता व दिवाळी उन्हाळी सुट्टी मध्ये शाळा घेऊन कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महिन्यात एकही दिवस गैरहजर न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन पर वेगवेगळी बक्षिसे पॅड, वॉटर बॉटल, कंपास पेटी ,टिफिन बॅग स्वखर्चातून देऊन विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्यास प्रेरित केले तसेच. यावर्षी इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी स्वखर्चातून बायोमेट्रिक  मशीन  बसवून नवीन उपक्रम सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यात हा इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक पद्धतीवर हजरी घेण्याचा पहिलाच प्रयोग आहे. या गोष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बायोमेट्रिक पद्धतीवर हजेरी देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे कुतूहल मनाला खूप समाधान देत होते असे वर्गशिक्षक अभिजीत वाळके  यांनी सांगितले. 


 आज सदर बायोमेट्रिक मशीनची अनावरण करण्यासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कूडलिक इंगळे , ज्येष्ठ शिक्षकं  संजय जाधव,दादासाहेब देवकाते मनोज पवार,  रवी ननवरे , मारूती भांगरे ,  सूनिल कदम , इंगोले,  किशोर,भरते,  संतोष वाघमोडे , सागर बरडकर, शिक्षकेतर कर्मचारी विनायक चांगन  हे सर्व उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक कूडलिक इंगळे  यांनी  उपक्रमाचे कौतुक करून  शिक्षकांनी सुद्धा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या प्राथमिक विभागाचे नाव उज्वल करावे असे आवाहन सर्व शिक्षक बांधवांना केले.

Post a Comment

0 Comments