कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट व पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भातंब्री ,रायखेल डोंगरमाळावर वृक्षारोपण
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधिक्षक माननिय अतुल कुलकर्णी(IPS) श्रीमती महिमा माथुर -कुलकर्णी सामाजिक कार्यकर्त्या तथा पर्यावरण तज्ञ , टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिकारी मा. गणेश चादरे, कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट चे प्रकल्प व्यवस्थापक डाॅ. दयानंद वाघमारे , तुळजापूर पोलीस विभागातून पोलीस निरीक्षक श्री गजानन घाडगे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. कांबळे, मा. मुंडे, मा. चासकर, पोलीस उपनिरीक्षक पवार मॅडम, पोलीस हवालदार श्री यादव श्री राऊत श्री फुलसुंदर श्री सागर व पोलीस शिपाई माळी वाहन चालक जाधवर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना महिमा माथुर कुलकर्णी निसर्ग हा मानवाशी जोडलेला आहे मानव व निसर्ग एकमेकास पूरक आहेत त्यासाठी आपण निसर्गाची जोपासना व निसर्गावर प्रेम केले पाहिजे खूप आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून वृक्ष लागवड करत आहेत व ती भविष्याची गरज देखील आहे. मा.अतुल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्हा हा एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने वृक्षारोपणाची मोहिम आखण्यात आलेली आहे कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट व गावकऱ्यांच्या सहकार्यातूनच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड शक्य झाली आपण पुढे देखील अशाच प्रकारे वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणार आहोत व ती आपली सर्वांची जिम्मेदारी आहे. व वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले.
वृक्षारोपणासाठी भांतब्री गावचे ग्राम पंचायत, इंदिरा कन्या हायस्कुल , मंगरूळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायखेल स्वागत मा. डाॅ. दयानंद वाघमारे तर सूत्रसंचालन मनोहर दावणे यानी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर बनसोडे, स्नेहल पाटील, प्रदीप कांबळे, सोमनाथ लोहार ,गंगा ताई ननवरे रवी भगत ,अजित बनसोडे राकेश जीटीथोर यांनी श्रम घेतले
0 Comments