Hot Posts

6/recent/ticker-posts

नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत बापल्योक या मराठी चित्रपटातील कलाकर तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आणि फिल्मचे पोस्टर जगदंबे चरणी वाहण्यासाठी उद्या

नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत बापल्योक  या मराठी चित्रपटातील कलाकर तुळजाभवानी मातेच्या  दर्शनासाठी आणि फिल्मचे पोस्टर जगदंबे चरणी वाहण्यासाठी उद्या तुळजापुरात- शंतनू गंगणे

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव


तुळजापुर : नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत बापल्योक  या मराठी चित्रपटातील कलाकर तुळजाभवानी मातेच्या  दर्शनासाठी आणि फिल्मचे पोस्टर जगदंबे चरणी वाहण्यासाठी उद्या रविवारी 13 ऑगस्ट रोजी तुळजापुरात येणार आहेत.

 उद्या दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह( पापनास तीर्थ ) येथे एक छोटीशी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. 

 विशेष म्हणजे या चित्रपटाची संपूर्ण निर्मिती / चित्रीकरण तुळजापूर शहर आणि तालुक्यात झालेले आहे आणि अनेक स्थानिक कलावंतांनी यामध्ये कामही केलेले आहे. 

 

आपणास विनंती आहे की या पत्रकार परिषदेस उपस्थित राहून चित्रपटाला प्रसिद्धी आणि तुळजापूर परिसरात चित्रपट निर्मितीचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. 


शंतनू शिवाजीराव गंगणे

Post a Comment

0 Comments