पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद येथे इंटरनॅशनल जस्टीस मिशन संस्थेतर्फे अनैतिक व्यापार अन्वेषण प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधि रूपेश डोलारे उस्मानाबाद
सदर कार्यशाळे मध्ये बिगारी कामगार तसेच अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार या कायद्याखाली पिडीताची सुटका, मदत,व पुर्नवसन या विषयावर इंटरनॅशनल जस्टीस मिशन या संस्थेच्या प्रमुख श्रीमती मेलिसा वालावलकर यांनी तर श्रीमती रेनिटा मेनेसेस यांनी सदर अधिनियमांचे कायदेशीर तरतुदीवर मार्गदर्शन केले.
सदर कार्याक्रमावेळी पोलीस स्टेशन ढोकी येथे वेठबिगार कायद्याखाली दाखल गुन्ह्यातील सुटका केलेले पिडीत मजुर यांचे हस्ते मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच कार्यशाळेस मा. पोलीस अधिक्षक उस्मानाबाद अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री नवनीत कॉवत यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेस मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. नवनीत कॉवत, इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या प्रमुख श्रीमती मेलिसा वालाववलकर, श्रीमती कॅसेंड्रा फर्नांडिस, श्रीमती रेनिटा मेनेझस, श्री. ब्रिटो माय नदार, श्रीमती शीला अल्फान्सो तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन चे अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.
0 Comments