सलगरा येथे शेतीच्या वादातून एकास मारहाण, नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
धाराशिव : शेतीच्या वादातून दोघांनी एकाच बेदम मारहाण केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 27 ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील सलगरा मडी शिवारात घडली होती.
याबाबत नळदुर्ग पोलिसांकडून मिळालेले सविस्तर माहिती अशी की, दिनांक 27 ऑगस्ट रोजी सलगरा येथील संभाजी भालचंद्र मोरे आणि वैभव भालचंद्र मोरे या दोघा भावंडांनी शेताचे शेजारी मधुकर सखाराम मोरे वय 54 वर्षे यांना शेतीचा जुना वाद उकरून काढत शिवीगाळ करीत लाथा बुक्क्या काठीने मारहाण केली, या मारहाणीत सखाराम यांच्या डाव्या हाताची बोटी फ्रॅक्चर केले. याप्रकरणी शनिवारी दिनांक 7 रोजी मधुकर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये दोघांवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
0 Comments