श्री तुळजाभवानी मातेच्या पावन नगरीतील नागरिक,व्यापारी ,देवीचे भक्त,पुजारी,यांनी आजच्या बंदला पाठिंबा दिल्याबद्दल अमोल कुतवळ यांनी मानले आभार
श्री तुळजाभवानी मातेच्या पावन नगरीतील नागरिक,व्यापारी ,देवीचे भक्त,पुजारी ,आणि पाठिंबा देणारे सर्वांचे आज दि. ११/१०/२०२३ रोजीच्या बंदला पाठिंबा दिला त्याबाबदल सर्वांचे मानपूर्व आभार
आजच्या बंदचे मुद्दे
तुळजापुर : तुळजापूर मंदिर विकास आराखडा मध्ये सर्वसामान्य यांच्या मागणीला व निवेदन देऊन सुद्धा विचार न केल्यामुळे , भक्तांना हिंदू धर्मानुसार तुळजाभवानी मंदिर महाद्वार मधून प्रवेश मिळण्यासाठी , भक्तांच्या आणि तुळजापूरकर यांच्या सोयीसाठी मंदिर परिसरातील निवेदन नुसार म्हणजे मंदिर प्रशासकीय इमारत याच्या जवळील जागेत दर्शन मंडप करणेसाठी ,श्री तुळजाभवानी देवी हि साडेतीन शक्तीपीठ मधील पूर्ण पीठ आहे या ठिकाणी येणाऱ्या भक्ताच्या धार्मिक रूढीपरंपरे नुसार विधी साठी या आराखड्यात सोय नसले मुळे तुळजापूर शहरातील सर्वंगीण विकास होण्यासाठी आणि सर्व व्यापारी बांधव यांच्या भविष्यातील उपजीविकासाठी मंदिर प्रशासन यांनी सर्व भक्ती पीठ जसे कि तिरुपती बालाजी , शिर्डीचे साई बाबा या ठिकाणी पाहणी करून तसा आरखडा करत असले बाबत आणि शक्ती पीठ याचा विचार होत नसल्या मुळे प्रस्तावित आराखडा हा अपूर्ण ,दिशाभूल करून शहर वासियांचे मत न घेता होत आहे , या मध्ये असलेली कंपनी आणि इतर याचे द्वेष आणि स्वार्थी धोरण आहे का ?
विरोध होतोय मार्ग का काढला जात नाही हजारो सह्यांचे निवेदन यांना किंमत का नाही , या विकास आरखड्या मध्ये अनेक त्रुटी आणि समस्या आहेत सदरील आरखडा होताना यापूर्वी झालेला तुळजापूर तीर्थक्षेत्र ३३२ कोटींचा आरखडा याचा अभ्यास करावा , तुळजापूरकर यांना ,व्यापारी बांधव ,देवी भक्त , पुजारी बांधव व इतर सर्व यांचा योग्य मागणीचा विचार करून यांचे मत मंदिर विश्वस्त यांनी विचारात घेऊन आराखड्या मध्ये बदल करावा हि अपेक्षा.
0 Comments