नातेपुते एज्यूकेशन संचलित डाॅ.बा.ज.दाते.प्रशालेचे स्नेहसंमेलन
नातेपुते प्रतिनिधी : येथील नातेपुते एज्यूकेशन संचलित,डाॅ.बा.ज.दाते.प्रशालेचे स्नेहसंमेलन थाटात पार पाडले. या वेळी विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती सादर करून पालकांमधून टाळ्यांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी व सामाजिक संदेश देणारी कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रारंभी व्यासपिठावरील सरस्वती व साविञीबाई पूले याच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच नटराज प्रतिमा,व दिपप्रज्वलन करून विद्यार्थाच्या विविध गूणदर्शनाला सूरूवात झाली..या कार्यक्रमामध्ये देवा श्री गणेशा,पार्वतीच्या बाळा,एरोबिक्स,हा गौरव मराठी भाषेचा,संपुर्ण जगालातूझ्या रूपाचा,नाटिका,जय हो,दैवत छञपती,अंबे कृपा करी,माय भवानी,राज आंल,मंगळागौर गीत,अष्टमी,लख्ख पडला प्रकाश,देवीच्या नावाचा अंबेच्या नावाचा ,लल्लाटी भंडार,डोई धरीला, धरीला मळवट अशा बहारदार गीतावर विद्यार्थानी बहारदार नृत्य सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
याप्रसंगी नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमूख,व्हा.चेअरमन संतोष काळे,सेक्रेटरी महेश शेटे,डाॅ.एम.पी.मोरे,अॅड डी.एन .काळे, नगराध्यक्षा अनिताताई लांडगे,नगरसेविका मायाताई उराडे,बाहूबली चंकेश्वरा,अरविंद पाठक,,अॅड.शिवाजीराव पिसाळ,बळीराजा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन,बाळासाहेब पांढरे,देविदास चांगण,मूख्याध्यापक विठ्ठल पिसे, पर्यवेक्षक दत्ताञय यादव,विनायक देशपांडे,सांस्कृतिक विभाग प्रमूख संजय पवार,आदि मान्यवर तसेच.या कार्यक्रमाचे सूञसंचालन भूमी लिबोंरे या विद्यार्थीनी केले.कार्यक्रमास संस्थेचे संचालक,सभासद,विद्यार्थी,पालक मोठ्या सख्येने उपस्थित होते.
उपसंपादक विलास भोसले
बालाघाट न्युज टाइम्स
0 Comments