Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठीच्या ऑनलाईन तारखा जाहीर|zilha parishad dharashiv online exam

धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठीच्या ऑनलाईन तारखा जाहीर
धाराशिव.दि.06 :- जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया सन 2023 च्या प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील पदापैकी दि.7 ऑक्टोबर-2023 रोजी रिगमॅन (दोरखंडवाला),वरिष्ठ सहाय्यक (लेखा),दि.8 ऑक्टोबर-2023 रोजी विस्तार अधिकारी (सां), दि.10 ऑक्टोबर-2023 रोजी विस्तार(कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक व दि.11 ऑक्टोबर-2023 रोजी लघुलेखक(उच्चश्रेणी),लघुलेखक(कनिष्ठ श्रेणी) व कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदांसाठी ऑनलाईन परिक्षा तीन सत्रात घेण्यात येणार आहे.

 ऑनलाईन परिक्षेची माहितीपुस्तीका व प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड (Download) करण्याबाबतची लिंक जिल्हा परिषद धाराशिवच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

 संबंधित उमेदवारांनी प्रवेशपत्र (Hall Ticket) व माहितीपुस्तीका उपरोक्त संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावे,असे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

                                      

Post a Comment

0 Comments