संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैर अर्थ काढू नका.समीर सोरटे
नातेपुते/प्रतिनिधी: ७४ वा संविधान दीन साजरा करत असताना आपल्याला घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैर अर्थ विद्यार्थ्यांनी काढू नये.आई वडिलांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैर फायदा घेऊ नका, छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल मुला मुलींनी उचलू नये असे विचार रिपाईचे तालुका कोषाध्यक्ष समीर सोरटे यांनी गिरवी ता.माळशिरस येथील कै.रंगनाथ कुलकर्णी माध्य .विद्यालय येथे संविधान दिन कार्यक्रमात व्यक्त केले.
पुढे बोलताना समीर सोरटे म्हणाले की हल्ली प्रसार माध्यमांमध्ये काही विकृत मनोवृत्तीचे लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे खरेच शिल्पकार आहेत का असा प्रश्न उपस्थित करतात आणि जर ते नसतील तर मग दुसरे कोण याही प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसते.देशाचे त्या वेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणि संपूर्ण घटना समितीने बाबासाहेबांचे योगदान मान्य केले आहे. त्यामुळे युवा पिढीने या वादात न पडता सतत विविध विषयाचे वाचन केले पाहिजे,आई वडील हे कष्ट करून तुम्हाला वाढवत असतात त्यांच्या कष्टाचे चीज तुमच्याकडून झाले पाहिजे असे भावनिक आवाहन या वेळी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे संस्थापक प्रफुल्ल काका कुलकर्णी यांनी संविधानाचे महत्त्व सांगून माझी जडण घडण ही आंबेडकरी विचार धारेतून निर्माण झालेच सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन युवक नेते प्रकल्प कुलकर्णी यांनी केले.
या वेळी कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक जाधव,सेवानिवृत्त मुख्याध्यापक गेना सावंत,युवक नेते आप्पा सावंत,शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments