Hot Posts

6/recent/ticker-posts

विलास पाटील यांना आमदारकीची संधी मिळाली तर आमचा आशिर्वाद - यशवंत दशरथ

विलास पाटील यांना आमदारकीची संधी मिळाली तर आमचा आशिर्वाद - यशवंत दशरथ 


कळंब, प्रतिनिधी - शिवसेनेचे नेते तसेच कळंब तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास पाटील हे खर्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेले समाजाभिमुख नेतृत्व असुन अशा नेतृत्वाला धाराशिव - कळंब विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील प्रमुख मंडळी खंबीरपणे मागे उभा राहून निवडूण आणतील असा आशावाद कळंब नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ यांनी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी यशवंत दशरथ तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रा डॉ संजय कांबळे, आदर्श मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, सामाजिक कार्यकर्ते मुहम्मद चाउस, बाजार समितीचे संचालक अरूण चौधरी, व्यापारी आनंद बलाई, जेष्ठ नागरिक भाऊसाहेब यादव, हसेगावचे माजी उपसरपंच महादेव यादव उपस्थित होते. 

पुढे बोलताना दशरथ म्हणाले की विलास पाटील यांचे वडील विश्वंभर पाटील यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली आहे. त्यांचाच वारसा त्यांचा मुलगा विलास पाटील चालवत आहेत. त्यांचे सामाजिक कार्य ग्रामीण भागाच्या विकासासाठी अविस्मरणीय आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आमदारकीच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाली तर माझा आशिर्वाद नक्कीच सोबत असेल असे सांगितले. 

यावेळी जिल्हाभरातून पाटील यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरीवारासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, शहरप्रमुख गजानन चोंदे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर पालकर यांनी केले तर आभार अमोल पांचाळ यांनी मानले. 




आता प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची लढाई - प्रा संजय कांबळे 

आता राज्यात प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई सुरू झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक मतदारसंघात पिढ्यानपिढ्या राज्य करणाऱ्या लोकांना पदावरून विस्थापित करून सर्वसामान्यांचे नेतृत्व स्थापित करण्याची वेळ आली आहे. आणि तशी चळवळ राज्यात बळ घेत आहे. त्यामुळे तालुक्यातून सर्वसामान्य घरातील आमदार दिसला तर शंका वाटण्याचे कारण नाही असे उदगार त्यांनी काढले व विलास पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यास शुभेच्छा दिल्या. 




निधी खेचून आणणारे नेतृत्व विलास पाटील - राजेंद्र बिक्कड 

विलास पाटील हे तालुक्यातून राज्याच्या राजकारणात कुठलेही पद नसताना प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्त्व असुन गेल्या चार वर्षांपासून ते कळंब, धाराशिव तालुक्यात जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध करता येईल यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. असे व्यक्तिमत्त्वाला मोठ्या पदावर जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली तर मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे गौरवोद्गार आदर्श मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी काढले. 




मी माझे काम करत रहाणार - विलास पाटील 


माझ्या घरातच माझे वडील विश्वंभर पाटील यांच्याकडून समाजसेवेचे बाळकडू मिळालेले आहे. त्यामुळे आम्ही अहोरात्र समाजासाठी सामाजिक कार्य कुठलिही अपेक्षा न करता करत आलो आहे. आणि भविष्यातही करत रहाणार पक्षाने संधी दिली तरी मला जनतेचा आशिर्वाद महत्वाचा आहे त्यामुळे माझ्यासाठी अगोदर जनता महत्वाची आहे आणि मला ग्रामीण भागासाठी आणखी जोमाने काम करायचे असल्याचे सत्कारमूर्ती विलास पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.


Post a Comment

0 Comments