Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव तालुक्यातील येडशी येथील सुतार कुटुंबातील माय लेकरांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना !

धाराशिव तालुक्यातील येडशी येथील सुतार कुटुंबातील माय लेकरांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना !इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ईश्वरीवर कुंटुबाचा भार
मयत सुमन सुतार व बापू उर्फ सागर सुतार

धाराशिव : तालुक्यातील येडशी येथील सुमन बंजरग सुतार व बापु उर्फ सागर बजरंग सुतार या माय लेकरांनी तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी जवळ  आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि,२४ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या हृदय पेलावणाऱ्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची आव्हान करण्यात येत आहे.

आजी व वडील गेल्या दहा पधंरा दिवसापासून  दवाखान्यात गेलेत तर घरात ८० वर्षाचे अंथरुणात खिळलेले वयोवृद्ध आजोबा, अर्धांगवायूच्या झटक्याने अंथरुणात खिळलेली आई, या सर्वांना सोबत घेऊन तिसरी शिकणारी ईश्वरी कशीबशी आपल्या कुटुंबाला हातभार लावत होती,आईला तर अर्धागवायूचा झटका  आल्याने  स्वताचे काम करणेही अवघड  अशापरस्थीतीत घरात खाण्यासाठी अन्नाचा कण नाही ... आजी व वडिलानी फाशी घेवून आत्महत्या  केलेला निरोप आला तेव्हा तिसरीत शिकणारी ईश्वरी धान्यातील सोयाबीन उपटण्यासाठी कामाला गेलीली शेतातून तिला कोणतरी मोटार सायकल व घरी सोडले...ती आली व आई च्या गळ्यात पडुन टाहो फोडला...आणी उपस्थिताचे  मन हेलावले.


 धाराशिव तालुक्यातील  येडशी  येथील सुमन बंजरग सुतार व बापु उर्फ सागर बजरंग सुतार यांनी तुळजापूर तालुक्यातील सांगवी जवळ  आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

 त्यांच्या पश्चात  पत्नी,वडील,एक मुलगी,दोन लहान मुले मयत बापुच्या पत्नीस  बालीका हिला गेल्या वर्षी अर्धागवायूचा झटका आला होता तर तर बापु हॉटेलात काम करत होता परंतू त्याला कर्जाचा बोजा झाला होता कर्जबाजारी बापू आणि आपल्या स्वतःच्या आईला सुमन सुतार यांना त्याने बहिणीच्या गावाकडे जाऊ असे सांगून  त्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. आईला घेवून बापू सुतार हा दहा दिवसापूर्वी गेला होता. दरम्यानच्या दिवसांमध्ये कुटुंबाचा भार अगदी तिसरीत शिकणारी ईश्वरी यांनी दुसऱ्याच्या शेतातील काम करून कशीबशी उपजीविका भागवली मात्र अचानक रविवारी सकाळी ईश्वरी कामाला गेली असता तेथे तिला निरोप मिळाला की तुझ्या आजींने आणि वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आजी व वडिलांनी आत्महत्या केली तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला... काही वेळातच आलेली गर्दी परत गेली आणी इश्वरीचा संघर्ष सुरु झाला...ति तिच्या लहान भांवडाचा सांभाळ करु लागली आणि जिवनाचा संघर्ष सुरू झाला. अशा या संघर्षमय जीवन जगणाऱ्या ईश्वरीच्या कुटुंबाला मदतीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.

आशा कार्यकर्ती व समाज सेवीका सीमा कदम यांनी या कुटुंबाला या दानशूर व्यक्ती कडुन यापूर्वी ही मदत मिळवून दिली असून हे कुटूब सध्या उघडे पडले असून दानशुर व्यक्तीशी यांना मदत करावी असे आवाहन सीमा कदम ९९२१०१३५८१ यांच्याशी या नंबरवर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments